Slide 1 of 1
व्याजाच्या पैशासाठी जीवे मारण्याची धमकी देणारे सावकार जेरबंद
हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः
अशोक बालगुडे
पुणे, दि. 17 : व्याजाच्या पैशांसाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बेकायदा सावकारांना अटक केली आहे. अजय सिंग दुधानी (वय ३२), निहालसिंग टाक (वय ३०) आणि बच्चनसिंग भोंड (वय ३०, सर्व रा. रामटेकडी हडपसर) अशी अटक केलेल्या सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी राहुल बबन वताडे (वय २८, रा. मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, अवताडे यांनी दुधानी, टाक, भोंड यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाच्या पैशांसाठी आरोपींनी त्यांना धमकावून दुचाकी ताब्यात घेतली होती. त्यानंतर तिघांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या अवताडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना पोलिसांनी अटक केली.
breaking
breaking
Tags:
Like
Comment
Share