Slide 1 of 1
पत्नीबद्दल अश्लील बोलणाऱ्याला नाशिक फाटा पुलावरून दिले ढकलून वाकड पोलिसांची दमदार कामगिरी ः सहा महिन
वाकड पोलिसांची दमदार कामगिरी ः सहा महिन्यानंतर आरोपींना ठोकल्या बेड्या
पुणे, दि. 17 ः सुतावरून स्वर्गात जाता येत नाही. मात्र, छोट्याच्या पुराव्याआधारे आरोपीला पकडण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. अशाच एका घटनेत मद्यपान करताना पत्नीला अश्लील शब्द वापरल्याने चिडून नाशिक फाटा पुलावून ढकलून देऊन हत्या करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. सिद्धांत रतन पाचपिंडे आणि प्रतीक रमेश सरवदे अशी अटक केलेल्यांची नावे असून, दिनेश दशरथ कांबळे असं हत्या केलेचे नाव आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दिनेशच्या आईने सहा महिन्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलिसांत दिली होती.
पोलिसांनी सांगितले की, दिनेश वडिलांची सोन्याची चेन परत घेऊन येतो म्हणून तो घरातून बाहेर पडला आणि तो घरी परतलाच नाही. तो परत येईल या अपेक्षेने आई-वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची उशिरा तक्रार दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं. वाकड पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर त्याच्या मित्राकडे चौकशी केली असता दिनेश दशरथ कांबळे हा १५ मार्च २०२३ मध्ये आरोपी मित्र सिद्धांत आणि प्रतीक यांच्यासोबत काळेवाडी येथील मैदानावर मद्यपान करण्यासाठी बसले होते. दिनेशने मद्यपाणाच्या नशेमध्ये प्रतीक रमेश सरवदे याच्या पत्नीबद्दल अश्लील भाषा वापरली याच रागातून दिनेशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून जखमी केले. यानंतर जखमी असलेल्या दिनेशला दोघांनी मोपेड दुचाकीवरून पुणे- मुंबई जुन्या महामार्गावरील नाशिक फाटा येथे आणून पुलावरून थेट पुणे- मुंबई जुन्या महामार्गावर फेकून दिले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अनेक वाहन त्याच्या अंगावरून गेली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अखेर सहा महिन्यांनी आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या.
Tags:
Like
Comment
Share