Slide 1 of 1
ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती
मुंबई, दि. 15 ः डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली असून, ढिगाऱ्याखाली दोन अडकले असून, आणखी काहीजण अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही दुर्घटना डोंबिवलीतील अहिरे रोड परिसरात घडली आहे. दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. स्थानिकांच्या मदतीने मदत कार्य सुरू केले आहे. अग्निशमनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आदी नारायण इमारत ही धोकादायक होती. काल संध्याकाळच्या सुमारास इमारतीला तडे गेले होते. महापालिकेने इमारत रिकामी करण्याची नोटीस दिली होती. पुढील तपास पोलीस करत असून, आणखी माहिती लवकरच हाती येईल, असे सूत्रांनी सांगितले.
Tags:
Like
Comment
Share