Slide 1 of 1
अडचणींवर मात करायला शिकले पाहिजे
प्राचार्य डॉ. कांदे ः ट्रिनिटी पॉलिटेक्निकमध्ये इंजिनिअर्स डे साजरा
अशोक बालगुडे
पुणे, दि. 15 ः स्वतःची समस्या सोडवू शकलो, तर राष्ट्राचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी होता य़ेईल, त्यासाठी अडचणींवर मात करायला शिकले पाहिजे. सकारात्मक दृष्टीकोन बाळगण्याची गरज आहे, असे विचार ट्रिनिटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. शरद कांदे यांनी मांडले.
कोंढव्यातील ट्रिनिटी पॉलिटेक्निकमध्ये भारतातील सर्वात प्रसिद्ध अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त इंडिनिअर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी चंद्रयान मॉडेल, ब्लाइंड कोडींग, ऑडियन पेपर, पोस्टर प्रेझेंटेशन, विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी विभागप्रमुख संतोष डोईफोडे, प्रा. हनुमंत इंगळे, प्रा. युवराज पवार, प्रा. स्मिता जगताप, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
के.जे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष कल्याणराव जाधव आणि संकुल संचालक समीर कल्ला यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संगणक विभागप्रमुख डोईफोडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
ग्रंथपाल स्वाती मते यांनी प्रास्ताविक केले. विभागप्रमुख प्रतीक्षा सणस यांनी आभार मानले.
Tags:
62 Views
Like
Comment
Share