संदीप कदम ः कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातर्फे इंडियन स्वच्छता लीग उपक्रम
अशोक बालगुडे
पुणे, दि. 15 ः इंडियन स्वचछता लीगमध्ये कचरामुक्त शहर, स्वच्छ आणि सुंदर शहर ठेवणे या संकल्पनेसाठी संयुक्त कृती आणि वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करणे हा मोहिमेचा व्यापक उद्देश आहे. आपला परिसर आणि शहर स्वच्छ ठेवून आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अर्बन-२.० उपक्रमांतर्गत " इंडियन स्वच्छता लीग" मोहिम सुरू करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने बोपदेव घाट येथे करण्यात आला. याप्रसंगी उपायुक्त संदीप कदम, सहाय्यक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे,
सहायक आरोग्य अधिकारी डॉ. घाटगे, ब्रँड ॲम्बेसेडर सुनीता नेराळे, ट्रेनिटी कॉलेजचे हर्षदा जाधव,
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, सुभाष परदेशी, हेमलता परदेशी, आरोग्य निरीक्षक, मुकादम, कर्मचारी आणि ट्रिनिटी कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
Like
Comment
Share