Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
15 Sep, 5:17 PM
more-icon
PreviousNext

मांजरी उपबाजारात कोथिंबीर, मेथी, फ्लॉवरने खाल्ला भाव कल्याणराव कोतवाल ः आवक वाढल्याने टोमॅटोचे दर घसरले, पाले-भाज्यांचे दर स्थिर अशोक बालगुडे पुणे, दि. 15 ः शेवाळेवाडी (ता.हवेली) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारमध्ये मेथी, फ्लॉवर आणि कोथिंबीने भाव खाल्ला. टोमॅटोची आवक वाढल्याने भाव घसरले असून, इतर पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याचे मांजरी उपबाजारप्रमुख कल्याणराव कोतवाल यांनी सांगितले. याप्रसंगी किरण घुले, राहुल शेवाळे, केतल घुले, लालासाहेब जाधव, रावसाहेब तावरे, श्रीकांत भंडारी, समीर घुले, गणेश शिंदे आणि शेतकरी-व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोतवाल म्हणाले की, शेतकरी ते थेट व्यापारी अशी मांजरी उपबाजाराची सर्वदूर ओळख आहे. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील शेतकरी सकाळी ताजा तरकारी घेऊन येतात, त्यामुळे या बाजारातील तरकारी खरेदीला व्यापारी पसंती देत आहेत. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील व्यापारी येथे शेतमाल खरेदीसाठी येतात. शेतकरी-व्यापाऱ्यांची कोणतीही अडचण होणार नाही, यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्य खबरदारी घेतली जात आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, वरुणराजाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उन्हाळ्यामध्ये तरकारीला पाणी कमी पडणार अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. आताच विहिरी आणि बोअरवेलने तळ गाठला आहे, अशी खंत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km