Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
15 Sep, 4:11 PM
more-icon

मनसेचे 'घे पॅकेज' आंदोलन : मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी केलेल्या घोषणा पूर्ण कराव्यात

अशोक बालगुडे पुणे, दि. 15 ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज (शुक्रवार, दि. 15 सप्टेंबर, 2023) क्रांती चौक येथे 'घे पॅकेज' आंदोलन करण्यात आले. 2012 ते 2023 चारही राजकीय पक्षांनी त्यांच्या मंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरासाठी वेगवेगळ्या घोषणा आश्वासने आणि पॅकेज जाहीर केले, याची उजळणी आज मनसेतर्फे करण्यात आली. ज्या मोठ्या घोषणा झाल्या होत्या, त्याचे पेपर कटिंग यावेळी आंदोलनात वापरण्यात आले. आधी केलेल्या घोषणा पूर्ण करा, नाही तर मंत्र्यांच्या गाड्या फिरवू देणार नसल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, बिपीन नाईक, जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार, प्रशांत जोशी, अशोक पवार पाटील, अभय देशपांडे, विक्की जाधव, प्रतीक गायकवाड पाटील, विक्रमसिंह परदेशी, संकेत शेटे, प्रशांत दहिवडकर, आकाश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती संभाजीनगरच्या वतीने मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळा बैठकीपूर्वी या अगोदर सरकारने केलेल्या पॅकेजेस आणि घोषणांची आठवण करून देण्यासाठी "घे पॅकेज" आंदोलन करण्यात आले. 2012 ते 2023 या कालावधीत चारही राजकीय पक्षाच्या मंत्र्यांनी छत्रपती संभाजी नगरसाठी वेगवेगळ्या पॅकेजच्या घोषणा केल्या आहेत. यात रोज पाणी देतो, केंब्रिज चौक ते नगर नाका अखंड उड्डाणपूल, नवीन बसस्थानक, स्मार्ट सिटी, सहा पदरी जालना रोड, मेट्रो, बुलेट ट्रेन, भूमिगत गटार योजना अशा घोषणांचा समावेश आहे. या सर्व घोषणांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आठवण करून दिली.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km