Slide 1 of 1
दफन करण्यासाठी घेतले जातात तीन हजार रुपये
माजी नगरसेवक ससाणे ः हडपसर स्मशनभूमीतील अजब प्रकार
अशोक बालगुडे
पुणे, दि. 14 ः हडपसर स्मशानभूमीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पालिका अधिकारी, ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांच्या पैसे मिळवून देण्यासाठी सोमवारी (दि. 18 सप्टेंबर, 2023) सकाळी 9 वाजता भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिला आहे.
ससाणे म्हणाले की, हडपसरमधील अमरधान स्मशानभूमीमध्ये मृत व्यक्तीचे दफन करण्यासाठी तीन हजार रुपये पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून घेतले जातात, ही बाब निंदणीय आहे. कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली, तर उत्तर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार अतिशय निंदनीय आहे. मागिल आठवड्यामध्ये ससाणेनगरमधील मृत व्यक्तीचा मृत्यू झाला. तेथे दफन करण्यासाठी खड्डा घेता यावा यासाठी जेसीबी पाठविला. रात्री दोन वाजता दफनविधी झाला. त्यानंतर दोन दिवसांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून तीन हजार रुपये घेण्यात आल्याचे समजले. त्याविषयी दफनभूमीतील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली, तर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. चार-दोन फावडे मारण्यासाठी तेथील कर्मचारी तीन हजार रुपये घेत असेल, तर ही बाब निश्चित माणुस्कीला काळीमा फासणारी आहे, असे त्यांनी सांगितले.
Tags:
Like
Comment
Share