Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
14 Sep, 7:44 AM
more-icon

Crime News बाळ आजारानं दगावल्याचा बनाव पोलिसांनी केला उघड

तिसरीही मुलगीच झाल्यानं आठ दिवसांच्या चिमुकलीची बापानेच केली हत्या अशोक बालगुडे मुंबई, दि. 14 ः 'बेटी बचाव बेटी पढाव'चा नारा शासन स्तरावर राबविला जात आहे. आजारानं बाळ दगावल्याचा बनाव करून तिसरीही मुलगी झाल्याने आठ दिवसाच्या चिमुरडीची हत्या करणाऱ्या नराधाम बापाला पोलिसांनी अटक केली. गोकुळ गोटिराम जाधव असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना हरिनगर तांडा (पहूर, ता. जामनेर, जि. जळगाव) येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पोलिसांनी सांगितले की, गोकुळ गोटिराम जाधव या इसमास अगोदर दोन मुली होत्या, त्यानंतर तिसरं अपत्य देखील मुलगीच झाल्यानं गोकुळ गोटीराम जाधव याचा संताप अनावर होऊन त्यानं आपल्या आठ दिवसांच्या चिमुकलीच्या तोंडात तंबाखू कोंबली आणि तिला तसंच पाळण्याच झोपवलं. तंबाखूच्या विषानं आठ दिवसांच्या या चिमुकलीनं काही वेळातच प्राण सोडला. सकाळी नराधम बापानं चिमुकली आजारी असल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा कांगावा केला. आरोपी पित्यानं जवळच्याच परिसरात पोटच्या चिमुकलीवर अंत्यसंस्कार केले. या सर्व प्रकाराची माहिती त्या परिसरातील आशा सेविकांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठांना यासंदर्भात माहिती दिली होती. वरिष्ठांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत संपूर्ण प्रकार कानावर घातला, तसेच, अनेक शंकाही उपस्थित केल्या. पोलिसांनी सर्व प्रकरण जाणून घेऊन तात्काळ आपली सूत्र हलवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी गोपनिय तपास केला असता, आरोपी गोटीराम जाधव यानंच हा खुनाचा धक्कादायक प्रकार केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Tags:  
./../../../../assets/lottie-icons/Sad.svg
1
115 Views
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km