Slide 1 of 1
खाऊच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्या स्वयंपाक्याला बदडले
वसईमध्ये घडला भयानक प्रकार ः
मुंबई, दि. 14 ः वसई परिसरातील सात वर्षीय मुलीला खाऊच्या आमिषाने पैसे देऊन बलात्कार करणाऱ्या शाळेतील नराधाम स्वयंपाक्याला पालकांनी चांगलेच बदडून पोलिसांच्या हवाली केले. मौर्य, असं या घटनेतील आरोपच नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, सात वर्षीय मुलीकडे खाऊसाठी रोज पैसे जास्त असायचे. आपण मुलीला इतके पैसे देत नाही, मग तिच्याकडे इतके पैसे येतात कुठून? असा प्रश्न पीडित मुलीच्या पालकांना पडला. त्यांनी याबाबत तिच्या मित्र-मैत्रीण आणि शाळेत विचारपूस करायचं ठरवलं. यानंतर पालक पीडित मुलीसोबत शाळेत आले. तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली. याच शाळेत स्वयंपाक्या म्हणून काम करत असलेला मौर्य हा मुलीला रोज खाऊसाठी पैसे देत होता. खाऊसाठी पैसे देत असताना हा नराधम रोज या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत होता. मुलीसोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर इतर विद्यार्थ्यांचे पालक देखील मोठ्या संख्येने शाळेत जमले. यावेळी संतप्त जमावाने मौर्यला चांगलाच चोप दिला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला शांत करत आरोपीला ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
Tags:
Like
Comment
Share