Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
14 Sep, 7:32 AM
more-icon

संघाच्या बैठकीमुळे दोन शाळा, एका कॉलेजला तीन दिवस सुटी

विद्यार्थी संघटनांनी नोंदवला आक्षेप ः अशोक बालगुडे पुणे, दि. 14 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय समन्वय बैठक पुण्यात होणार असल्याने दोन शाळा आणि एका महाविद्यालयाला तीन दिवस सुटी देण्यात आली आहे. या प्रकाराबाबत विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. संघाच्या राष्ट्रीय समन्वय बैठकीसाठी देशभरातील स्वयंसेवक पुण्यात आले आहेत. ही बैठक स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असून, मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. सरसंघचालक मोहन भागवत, सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण प्रसारक मंडळीच्या टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, एसपीएम इंग्रजी माध्यम शाळा आणि मूकबधीर शाळा यांना तीन दिवस सुटी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शासकीय कार्यक्रमांबाबत काहीच अडचण नाही. मात्र शहरात अन्यत्र सोय असताना स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रम घेण्याचे कारण काय, विद्यार्थ्यांना परस्पर सुटी कशी काय दिली जाऊ शकते, संघाचा कार्यक्रम हा शासनाचा अधिकृत कार्यक्रम समजायचा का, असा सवाल स्टुडंट हेल्पिंग हँडच्या कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित केला. दरम्यान, कोरोनामुळे बिघडलेले शैक्षणिक वेळापत्रक आता कुठे पूर्वपदावर येत आहे. गणेशोत्सवासाठी सुटी दिली जाणार असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीसाठी तीन दिवस विद्यार्थ्यांना सुटी देणे स्वीकारार्ह नाही, असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी सांगितले.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km