Slide 1 of 1
पार्टटाइम नोकरीच्या आमिषाने लाखोचा गंडा घालणाऱ्यावर गुन्हा
नाशिकमधील घटना ः
मुंबई, दि. 14 : ऑनलाइन पार्टटाइम व्यवसायातून नफा मिळवून देण्याच्या आमिषाने तीन लाख 5 हजार रुपयांना गंडा घालणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहें. याप्रकरणी रवींद्र पांडूरंग डोंगरे (वय ३६, रा. पंचवटी) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी सांगितले की, पंचवटी परिसरात राहणाऱ्या रवींद्र डोंगरे यांना ८ ते १६ ऑगस्ट या कालावधीत वेबसाइट आणि फोनद्वारे संशयितांनी संपर्क साधला. त्यावेळी पार्टटाइम स्वरूपात व्यवसाय केल्यास त्यामाध्यमातून अधिकचा नफा मिळवून देण्याचेही आमिष दाखविले. त्यासाठी गुंतवणूक व भांडवल म्हणून टप्प्याटप्प्याने ३ लाख ५ हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात घेतले. मात्र, त्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू झाला नाही. किंबहुना गुंतविलेले पैसेही परत न मिळाल्याने डोंगरे यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रार अर्जावरून सायबर पोलिसांनी बँक खाते क्रमांक, यूपीआय आयडी आणि टेलिग्राम आयडीवरील संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्याकडे पुढील तपास देण्यात आला आहे. महाराष्ट्र सायबर सेल आणि देशातून त्यावर नियंत्रण मिळविण्यात येत असले, तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन नाशिक सायबर पोलिसांनी केले आहे.
Tags:
Like
Comment
Share