Slide 1 of 1
कामावरून काढून टाकल्याच्या रागातून हल्ला करणाऱ्यावर गुन्हा
कोंढव्यातील शांतीनगरमधील घटना ः
अशोक बालगुडे
पुणे, दि. 13 ः मद्यपान केल्यामुळे कामावरून काढून टाकल्याच्या रागातून मालकावर हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू शिवशरण (वय 43, रा. सुखसागरनगर, कोंढवा, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ही घटना कोंढवा बुद्रूकमधील शांतीनगर सोसायटी परिसरात घडली आहे. सुधीर बनसोडे असे गंभीर जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, विष्णू शिवशरण यांचे मेहुणे सुधीर बनसोडे यांची केएसएमएस नावाची सुरक्षा एजन्सी आहे. विविध सोसायटींना सुरक्षा रक्षक नेमणूक केले जातात. 12 सप्टेंबरला सुधीर शांतीनगर सोसायटी परिसरातील सुरक्षा रक्षक व्यवस्थित कामावर हजर आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी गेलेले होते. त्यावेळी एकजण मद्यपान करुन कामावर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले. त्याच रागातून संबंधिताने सुधीरला बांबूने मारहाण करुन वार करीत गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर पुढील तपास करीत आहेत.
Tags:
Like
Comment
Share