Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
13 Sep, 8:27 PM
more-icon

घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

मुंढवा पोलिसांची दमदार कागिरी ः 14 दुचाकीसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त अशोक बालगुडे पुणे, दि. 13 ः घरफोडीसह दुचाकी चोरी करणाऱ्यांच्या मुंढवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून 14 दुचाकी वाहने व घरफोडीतील सोने व रोख रक्कम असा एकूण सात लाख रुपयाचा ऐवज जप्त करून 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. गोरख विलास धांडे (वय 20, रा. गोकुळनगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, दोन मुले संशयीतरित्या दुचाकी घेऊन घोरपडी गावात फिरत असल्याची माहिती एपीआय संदीप जोरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी त्याने 14 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदिप कर्णीक, अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे, सहायक पोलिस निरीक्षक संदिप जोरे, दिनेश राणे, दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे सचिन पाटील, निलेश पालवे व स्वप्नील शिवरकर यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली. दरम्यान, मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे म्हणाले की, घरफोडी आणि वाहनचोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविली आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांना चोरट्यांची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन 14 दुचाकी जप्त करून इतर ऐवज जप्त केला आहे.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km