शाडूमातीपासून श्रींच्या मूर्ती बनविण्याते विद्यार्थिनी रमल्या
प्राचार्या कालेकर ः स्ट्रोक फाउंडेशनच्या वतीने दाखविले प्रात्यक्षिक
अशोक बालगुडे
पुणे, दि. ९ ः श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कार्यकर्त्यांसह चिमुकल्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या हडपसरमधील चं.बा. तुपे साधना कन्या विद्यालयामध्ये स्ट्रोक फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक शाडू मातीपासून श्रींची मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये गर्ल गाईड विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. स्ट्रोक फाऊंडेशनचे सुशील कुमार भिसे व गाईड शिक्षिका राऊत यांनी श्रींची मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याप्रमाणे अनेक विद्यार्थिनींनी मूर्ती बनविण्यात रममान झाल्या होत्या, अशी माहिती प्राचार्या सुजाता कालेकर यांनी दिली. याप्रसंगी पर्यवेक्षिका छाया पवार, सौ. खामकर, सौ. निघोजकर, विद्या निकम आणि शिक्षकवृंद, विद्यार्थिनी मोठ्या संख्यने उपस्थित होत्या.
Tags:
75 Views
Like
Comment
Share