Slide 1 of 1
दादांनी टोचले दादांचे कान ः कार्यक्रमाची वेळ पाळायला शिका
पुणे, दि. ९ ः कार्यक्रमाला लवकर जायला शिका. लवकर वेळेवर उठायला शिका, असे अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे कान टोचले. दरम्यान, कार्यक्रमामध्ये हीच चर्चा चांगली रंगली होती.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार वेळेत पोहोचले. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे वेळेवर आले नाही. त्यामुळे अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत, आपल्या भाषणात उपदेशाचे सल्ले दिले.
पवार म्हणाले, राजकारण करताना माझाही शिक्षण संस्थाशी संबंध आहे. त्यामुळे तेथे काम करण्याचा अनुभव आहे. राज्य शासन शिक्षणावर ८० हजार कोटी रुपये खर्च करते. शिक्षणासाठी राज्य शासन, मुख्यमंत्री, मंत्री कुठेही काटकसर करत नाहीत. ज्ञान संपादन करणे महत्वाचे असून, शिक्षकांचे यश हे त्यांचे कामगिरीवर अवलंबून असते. पुणे जिल्हयातील मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यात शिक्षकांचे संख्या कमी असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होत आहे. पाचवीचे शिष्यवृत्ती निकाल लागलेला असून, या परिक्षेत ६४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रत्येक तालुक्यातील निकाल वेगवेगळे आहे. माझी शिक्षकांना विनंती आहे की, तुमच्या काही अडचणी असतील, तर सांगा,मी त्या अडचणी सोडवतो. परंतु विद्यार्थी चांगल्याप्रकारे घडविण्याचे काम करा. नाही तर तुमच्यावर एक व्यक्ती प्रमोशन करुन आणून बसवावा लागेल अशी वेळ आणून देऊ नका. शिरुर तालुक्यात चांगल्याप्रकारे निकाल लागतो. मात्र, दौंड, हवेलीत शून्य टक्के निकाल लागतो, ही बाब चांगली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Tags:
61 Views
Like
Comment
Share