Slide 1 of 1
पुण्यातील मुंढव्यात विजेच्या धक्याने दोघांचा मृत्यू
मुंढवा पोलिसांनी बांधकाम ठेकेदारावर केला गुन्हा दाखल
पुणे, दि. ९ ः मुंढवा परिसरात डेव्हलपमेंट बिल्डिंगसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये ३० जून रोजी पत्र्याचे शेडमध्ये विजेचा करंट उतरून शॉक लागल्याने आठ आणि सहा वर्षाच्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. शौर्य पोटफोडे (वय ८) आणि कान्हा पोटफोडे (वय ६) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करून संबंधित बांधकाम साइटवरील ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. धरू काळे (रा. नऱ्हे, आंबेगाव, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पूजा गणेश पोटफोडे (वय २४, मूळ रा. नागपूर) या महिलेने तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पूजा पोटफोडे ही महिला कामाच्या निमित्ताने पुण्यात राहण्यास आलेली होती. ३० जून रोजी राहते पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी धारू काळे यांनी बिल्डिंगमधील लाईट मीटरमधून जुन्या केबलच्या आधारे तिला लाईट लावून दिली होती. पत्र्याच्या शेडमध्ये लाईट लावताना कोणतीही खबरदारी न घेतल्याने त्याच्या हलगर्जीपणामुळे लाईटचा पत्र्याच्या शेडमध्ये विजेचा करंट उतरून शॉक लागून तक्रारदार हिचा मुलगा शौर्य पोटफोडे (वय ८) आणि कान्हा पोटफोडे (वय ६) असे दोघे जागीच मरण पावले. दाखल गुन्ह्याचा तपास करून गुन्हा नोंद केल्याची माहिती मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एस भोसले करत आहे.
Tags:
1
87 Views
Like
Comment
Share