Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
09 Sep, 8:57 AM
more-icon

पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीची बाजी, भाजपची पिछेहाट मुंबई, दि. ९ ः पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने सातपैकी चार जागांवर दणदणीत विजय मिळविला, तर भाजपला तीन जागांवर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशची जागा भाजपला जिंकण्यात अपयश आले आहे. पश्चिम बंगालमध्ये ‘इंडिया’तील घटक पक्ष वेगवेगळे लढूनही तृणमूल काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली. उत्तरप्रदेश आणि झारखंडमध्ये मात्र ‘इंडिया’च्या ऐकीचा भाजपला मोठा फटका बसला. केरळमध्ये भाजप स्पर्धक नसल्याने काँग्रेस व ‘माकप’ एकमेकांविरोधात लढले. त्रिपुरामधील दोन आणि उत्तराखंडमधील एका जागेवर भाजपला विजय मिळवण्यात यश आले आहे. केरळमधील पुथुप्पली येथे काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कांग्रेसने बाजी मारली आहे. झारखंडमध्ये I.N.D.I.A आघाडीकडून JMM ने विजय मिळवला आहे. उत्तरप्रदेशमधील घोसी येथील जागेवर समाजवादी पार्टीच्या सुधारक सिंह यांनी विजय मिळवला आहे. १) उत्तरप्रदेश ः घोसी येथील जागेवर इंडिया आघाडीकडून समाजवादी पार्टी (SP)च्या सुधाकर सिंह यांनी विजय मिळवला. सुधाकर यांनी भाजपच्या दारा सिंह यांचा 42672 मतांनी पराभव केला. २) झारखंड ः डुमरी मतदारसंघात I.N.D.I.A आघाडीकडून झारखंड मुक्ति मोर्चा (JMM) च्या बेबी देवी यांनी बाजी मारली आहे. त्यांनी एनडीएच्या उमेदवार यशोदा देवी यांचा 13000 हजार मतांनी पराभव केला. ३) उत्तराखंड ः बागेश्वर मतदार संघातून भाजपच्या पार्वती दास यांनी विजय मिळवला. पार्वती दास यांनी काँग्रेसच्या बसंत कुमार यांचा पराभव केला. चंदन राम दास यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक झाली. ४) त्रिपुरा ः बॉक्सानगर आणि धनपूर मतदार संघात भाजपने विजय मिळवला. धनपूरमधून भाजपच्या बिंदु देबनाथ यांनी CPI (M) च्या कौशिक चंदा यांचा 18,871 मतांनी पराभव केला. तर बॉक्सानगर येथे तफज्जल हुसैन यांनी CPI (M) च्या मिजान हुसैन यांचा 30,237 मतांनी पराभव केला. ५) केरळ ः पुथुप्पलीमधून काँग्रेसच्या चांडी ऑमान यांनी 37,000 पेक्षा जास्त मतांनी विजय नोंदवला. ओमान चांडी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. भाजपकडून लिजिन लाल निवडणुकीच्या रिंगणात होते. ६) पश्चिम बंगाल ः धुपगुडी मतदार संघात तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. त्यांचा चार हजार मतांनी विजय झाला. भाजपकडून येथे टक्कर देण्यात आली.
Tags:  
56 Views
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km