Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
09 Sep, 8:41 AM
more-icon

फोनवर बोलताना इमारतीवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

वाकड पोलिसांत फिर्याद ः पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौकात घडली घटना पोलीस तपासात गुंतले अशोक बालगुडे पुणे, दि. ९ ः पिंपरी चिंचवड परिसरामध्ये फोनवर बोलताना तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. अजय रंगनाथ हंडीबाग (२१, रा. शिवशंकर हौंसिंग सोसायटी, म्हेत्रेवस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही दुर्घटना डांगे चौक येथे बुधवारी (दि. ६) सकाळी घडली होती. अचानक घडलेल्या घटनेने सर्वांना धक्का बसला आहेत. पोलिसांनी सांगितले की, अजय हे बुधवारी सकाळी डांगे चौक येथील हाय लाइफ टॉवर येथील इमारतीमध्ये कामानिमित्त गेले होते. मात्रस त्यांना फोन आल्याने ते मोबाईलवर बोलत असताना ते इमारतीवरून खाली पडले. त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पंचनामा करत त्यांचा मोबाईल तपासला. मात्र, त्या मोबाइलचा डिस्प्ले फुटल्याने ते नेमके कोणाशी बोलत होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, पोलिसांकडून त्यांच्या मोबाइल क्रमांकाचा सीडीआर मागविला आहे. त्यानंतर यामगचे कारण समोर येणार आहे. मात्र ते ज्या इमारतीवरून खाली पडले त्या ठिकाणावर कठडे लावलेले आहेत. त्यामुळे नेमके ते खाली पडले की पाडले की ती आत्महत्या आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अजय यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ते नेमके कुठल्या कामासाठी आले होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
Tags:  
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km