Slide 1 of 1
येरवडा कारागृहातील बंदिवानांना ह्यूमन राईट्सने दिले बहिणीचे प्रेम
भारती तुपे ः "ह्यूमन राईट्स महिलांनी येरवडा बंदिवानांना बांधली राखी
अशोक बालगुडे
पुणे, दि. ९ ः कळत-नकळत घडलेल्या गुन्ह्यामध्ये येरवडा कारागृहामधील बंदिवान कुटुंबीयांच्या सणसमारंभ आणि प्रेमापासून दुरावतात. त्यांना रक्षाबंधनानिमित्त बंदिवानांना बहिणीचे प्रेम दिले. बहिण-भावाच्या प्रेमाची झालर देण्याचे काम केल्याची भावना ह्यूमन राईट्सच्या महाराष्ट्र अध्यक्षा भारती तुपे यांनी व्यक्त केली.
ह्यूमन राईट्सच्या पुणे विभागाच्या वतीने येरवडा कारागृहातील रक्षाबंधनाचे औचित्य साधून राखी बांधून बहिण-भावाचे नाते दृढ केले.
याप्रसंगी ह्यूमन राईट्स महाराष्ट्र अध्यक्षा अंजुला जैस्वाल, पुणे उपाध्यक्षा श्रीदेवी गांधी, भारती रमेश तुपे, मनिषा शेवाळे, राष्ट्रवादीच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्ष सविता मोरे उपस्थित होते. या वेळी बंदिवानांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.
दरम्यान, जयस्वाल म्हणाल्या की, ह्युमन राईटच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले जात आहे.
कारागृह अधीक्षक अनिल खामकर, तुरुंगाधिकारी राजेंद्र मरळे, संतोष कोकणे यांनी मोलाचे सहकार्य केले.
Tags:
Like
Comment
Share