Slide 1 of 1
दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने लुबाडणाऱ्या रिक्षाचालकावर गुन्हा
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः
अशोक बालगुडे
पुणे, दि. ९ ः मैत्रिणीसोबतच्या भांडणात जखमी झालेल्या तरुणाला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने मारहाण करून लुबाडणाऱ्या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक उल्हास सावंत (रा. भोर) आणि त्याचा दाजी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विक्रम सुरेश पोकळे (वय ३७, रा. धायरी) यानी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, विक्रम पोकळे याचे मैत्रणीबरोबर भांडण झाले होते. यामध्ये त्याच्या हाताला काच लागून जखमी झालेल्या उल्हास सावंत याने दवाखान्यात घेऊन जातो असे म्हणून रिक्षात बसवले. रिक्षात अगोदरच रिक्षा चालकाचा दाजी बसला होता. रिक्षाचालकाने आंबेगाव पठार येथील प्यासा बारमध्ये रिक्षा थांबवली. तेथून दारु घेऊन तिघेही रिक्षातच दारु पित बसले. दरम्यान, काहीही कारण नसताना उल्हास सावंत याने रिक्षातून खाली उतरुण लोखंडी हत्याराने पोकळे याच्यावर वार केले. याप्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक घोगरे करत आहेत.
Tags:
Like
Comment
Share