Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Rahim Shaikh
22 Oct, 2:03 PM
more-icon
PreviousNext

विद्यापीठ उपपरिसरातील नाट्यशास्त्र व लोककला विभागास विद्यापीठ केंद्रीय युवक महोत्सवात उत्तुंग यश

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आयोजित केंद्रीय युवक महोत्सव नुकताच संपन्न झाला. या महोत्सवात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरातील नाट्यशास्त्र व लोककला विभागातील विद्यार्थी कलाकारांनी 15 पारितोषिक प्राप्त केले आहेत. या प्रचंड यशाबद्दल विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते मार्गदर्शक प्राध्यापक व यशस्वी विद्यार्थी कलाकार यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नाट्यशास्त्र विभागातील मार्गदर्शक डाॅ. गणेश शिंदे, डाॅ. उषा कांबळे, प्रा. योगेश घाडगे व सर्व यशस्वी विद्यार्थी कलाकारांचा विशेष कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 1. पंचरंग प्रतिष्ठान तुळजापुर फिरत चषक 2. नाट्य- जनरल चॅम्पियनशिप 3.शोभा यात्रा -प्रथम 4. एकांकिका -प्रथम 5.सर्वोत्कृष्ट अभिनय पुरूष - प्रथम 6. सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री- प्रथम 7. लघुपट - प्रथम 8. स्पाॅट फोटोग्राफी- प्रथम 9. वासुदेव- प्रथम 10. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- प्रथम 11. शास्त्रीय नृत्य- द्वितीय 12. प्रहसन- तृतीय 13.मिमिक्री- तृतीय 14.लोकनृत्य- तृतीय चौदा कलाप्रकारात प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातुन भव्य यश प्राप्त केले आहे. यावेळी सहायक कुलसचिव भगवान फड, कक्ष अधिकारी विद्याधर गुरव, कमवा व शिका योजना समन्वयक डाॅ. गोविंद कोकणे, जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डाॅ. नितिन पाटिल, रसायनशास्त्र विभागप्रमुख डाॅ. मेघश्याम पाटिल, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. जितेंद्र शिंदे, व्यवस्थापन शास्त्र विभागातील प्रा. सचिन बस्सैये, मल्लिनाथ लामजणे, चंद्रकांत आनंदगावकर, धनराज सोमवंशी, व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थितीत होते.
Tags:  
93 Views
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km