Slide 1 of 1 

सगळ्यांचे दिवे आज पेटतील, पण आमचा कायमचा विझला...
दिवाळीचा पहिला दिवस. आज सर्वांचे दिवे पेटतील. पण आमच्या घरचा दिवा आज कायमचा विझला. रंजना दिवाणे गोंड यांची बहीण अश्रू अनावर होताना सांगत होत्या.
हा माझा मोठा भाऊ. तो मागील सहा वर्षांपासून वाघोलीत राहून सफाईची कामे करतो. माझे पतीही तेच काम करतात. माझ्या पतीला ही घटना कळताच ते घटना स्थळी आले. तो पर्यंत पोलीस व अग्निशमक पोहचले होते. त्यांनी मला सांगितले. मग मी व वहिनी येथे आलो. भावाचा मृतदेह पाहून शरीरच गळाले. वहिनी तर पूर्णपणे तुटली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी एवढी वाईट घटना आमच्या नशिबी आली. त्याला दोन छोटी मुले आहेत. भर दिवाळीत हे संकट आमच्यावर कोसळले. दिवाळीचा सण आज सुरू झाला. सगळीकडे आज दिवे पेटतील. पण आमचा दिवा कायमचा विझला. असे सांगताना त्यांना हुंदके आवरत नव्हते. त्यांनी घटनेनंतर वहिनी व भावाच्या दोन मुलांना आपल्या घरी सोडून त्या घटना स्थळी होत्या. आपल्या खामगाव या गावीच भावावर अंत्यसंकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता गेलेला भाऊ तर परत येणार नाही. मात्र वहिनी व दोन मुले यांचे पुढील आयुष्य व्यवस्थित जावो यासाठी त्यांना येथेच आणून सर्व मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नितीन गोंड यांच्या पत्नी ही घर कामे करतात. आता त्यांनाच मुलांची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागणार आहे.
गणेश भालेराव याच्यावरही नांदेड येथे अंत्यसंकर करणार असल्याचे मावस भाऊ सुनील शिंदे यांनी सांगितले. तो सहा वर्षांपासून पुण्यात कामे करीत होता. त्याला एक भाऊ व एक बहीण आहे. तो कुटुंबाचा एक चांगला आधार होता.
---------------------------------------------------------
Tags:
418 Views