Slide 1 of 1
मुदखेड येथे नाटकाच्या माध्यमातून सायबर विषयी जनजागृती मोहीम
*मुदखेड येथे नाटकाच्या माध्यमातून सायबर विषयी जनजागृती मोहीम*
मुदखेड ता.प्र.
मुदखेड शहरात दि.१२ एप्रिल रोजी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी व तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात, रेल्वे स्टेशन भागात आधार सामाजिक विकास संस्था अलजापुर सातारा व नांदेड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरंजनातून समाज प्रबोधन ही जन जागृती कार्यक्रम राबविण्यात आला.
सध्याच्या काळात मोबाईल वरुन फसवणुकीचा प्रकार फार मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळे सायबर सुरक्षा रथ ठिकठिकाणी जाऊन नाटकाच्या माध्यमातून नागरीकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे.
जसे की आपण इंटरनेट वापरत असताना आपण सुरक्षित आहोत का याची दक्षता घेणे, तुमची वैयक्तिक माहिती कोणी चोरी करत आहेत का, तुमच्या मोबाईल मधील फ्री ॲप्स च्या माध्यमातून तुमची बँकिंग व वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते, तुमच्या मोबाईल, कॅम्पुटर अथवा लॅपटॉप मध्ये लायसेन्ड अॅटीव्हायरसचा वापर करा, फ्री ॲप डाऊनलोड करताना त्यांचे अॅग्रीमेंट वाचा, वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर टाकू नका, अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, इत्यादी माहिती या सायबर क्राईम सुरक्षा रथ च्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून घेण्यात आला.
तसेच आधार सामाजिक विकास संस्था अलजापुर सातारा येथील कलावंत नांदेड पोलीस व क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर विषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सायबर क्राईम पोलीस स्टेशन नांदेडचे काशिनाथ कारखेडे व सामाजिक विकास संस्था सातारा चे सुनील नलावडे ,मल्हारी जाधव, राजेंद्र मोरे ,ऋत्विक रांस्ते,सुयश बाबर,किरण घोदे, आनंद भगत, यांनी आपल्या नाटकाच्या माध्यमातून नागरिकांना सावधान राहायला सांगितले आणि तशी घटना घडलीच तर नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना सविस्तर माहिती देऊन तक्रार नोंदवा.
जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.
या जनजागृती कार्यक्रमास उपस्थित असलेले मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक आनंत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.कमल शिंदे मॅडम,व नांदेड येथील सायबर क्राईमचे काशीनाथ कारखेडे, डि एस बी चे किशोर पाटील, पांचाळ सर, यांची उपस्थिती होती.