हृदय व श्वसन रक्षण कौशल्य ज्ञान प्रत्येकासाठी महत्त्वाचे
डॉ. आडकर ः जेएसपीएमच्या फार्मसीमध्ये आपत्कालीन उपाययोजनेचे प्रात्यक्षिक कार्यक्रम
पुणे, ता. 31 ः सीपीआर म्हणजेच हृदय व श्वसन रक्षण कौशल्याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे आहे. कोणत्याही साधनांशिवाय आपात्कालीन परिस्थितीत तुम्ही मरणासन्न अवस्थेतील व्यक्तीचे प्राण वाचवू शकता. या कौशल्यामुळे एखाद्या व्यक्तीला जीवनदान देता आले, तर ती आपल्यासाठी आयुष्यभर समाधान देणारी बाब असते, असे स्पष्ट मत प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी उपस्थितांना केले.
हडपसर येथील जेएसपीएमच्या सावंत इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी येथे आज (शुक्रवार, दि. ३१ मार्च, २०२३) सीपीआरचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन संचालक डॉ. संजय सावंत व डॉ. वसंत बुगडे यांच्या उपस्थितीत केले होते.
प्रा. पल्लवी शेळके म्हणाल्या की, मानवी सीपीआर प्रशिक्षण टेबलच्या सहाय्याने शरीरातील हृदयाचे स्थान, रक्तप्रवाह यंत्रणा, तंत्रशुद्ध सीपीआर पद्धती, हाताद्वारे पंपिंग व तोंडावाटे श्वास देता आला पाहिजे. तसेच, प्रा. शेळके यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये सीपीआर देताना कोणती दक्षता घ्यावी व प्रथमोपचार कसा करावा याविषय़ी प्रथमवर्ष डीफार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले.
प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. कोमल भोसले, प्रा. निकिता कोलते, प्रा. सागर सोनार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
Tags:
1
97 Views