Slide 1 of 1 

जेएसपीएममध्ये आरोग्यमंत्र्यांचा वाढदिवस आरोग्य दिन म्हणून साजरा
उंड्री, ता. १६ ः जेएसपीएम शैक्षणिक संकुलामध्ये आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा वाढदिवस "आरोग्य दिन" म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी १७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. हांडेवाडी रस्ता येथील महात्मा ज्योतिबा फुले चौक ते श्रीराम चौक सातवनगरमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच, अनाथांची आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि खाऊ वाटप करण्यात आले.
लसीकरण विषयक प्रबोधन रॅली, रक्तदान, वृक्षारोपण करीत महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
संचालक डॉ. वसंत बुगडे व डॉ. संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर, प्राचार्य डॉ. वैशाली पोटनिस, प्रा. सागर सोनार, प्रा. अनुराधा पाटील, प्रा. अभय काळे, प्रा. भागवत चव्हाण, प्रा. सुचिता धामणे यांनी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. प्रा. स्वप्निल गाडेकर, प्रा. कोमल भोसले, प्रा. सुरेखा शेगार, प्रा पल्लवी शेळके, प्रा. निकिता कोलते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
Tags:
3
196 Views