Slide 1 of 1 

प्रत्येक क्षेत्रात महिलांची उत्तुंग भरारी- सोनालिका साठे
उंड्री, ता. 8 ः विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. दामिनी, निर्भया पथकाच्या महिला-मुलींना संरक्षण दिले जाते, असे वानवडी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सोनालिका साठे यांनी सांगितले.
जेएसपीएम जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये जागतिक महिलादिनानिमित्त पोलीस खात्यातील महिलांसह महाविद्यालयातील सेवक-विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. जेएसपीएमचे संचालक डॉ. संजय सावंत, डॉ. वसंत बुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मार्शल आर्टचे विश्वजीत काटकर आणि अभिजीत हरपळे यांनी स्वसंरक्षणाविषयी मार्गदर्शन करीत प्रात्यक्षिक करून दाखविले.
प्रा. अनुराधा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कोमल भोसले, प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. सुरेखा शेगर, प्रा. निकिता कोलते, प्रा. पल्लवी शेळके, प्रा. सागर सोनार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
Tags:
1
62 Views