Slide 1 of 1 

राजमाता जिजाऊ उद्यानात दिवाळी पहाटचे आयोजन -
पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात रविवार ता.२३ ते बुधवार ता.२६ पर्यंत दिवाळी पहाट सांगितिक मेजवानीचे आयोजन आमदार लक्ष्मण जगताप,माजी नगरसेवक शंकर जगताप व स्थानिक आजी माजी नगरसेवक व पदाधिका-यांच्या वतीने करण्यात आले आहे.रविवार ता.२३ प्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर,संज्योती जगदाळे,स्वप्ना काळे,राजू जाधव यांचे गायन होणार आहे.सोमवार ता.२४ प्रसिद्ध पार्श्वगायिका राधा खुडे,रविंद्र खोमणे,सायली टाक,मनिष ठुम्बरे,यांचे गायन होणार आहे.मंगळवार ता.२५ आंतरराष्ट्रीय कलाकार ममता नेने, योगिता गोडबोले,गणेश कुमार, अश्विनी,शोभा कुलकर्णी यांचे गायन होणार आहे.बुधवार ता.२६ सुरसंगम प्रस्तूत नितीन कदम,आकाश कुंभार, नामदेव तळपे यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. पहाटे ५:३० ते ८ यावेळेत राजमाता जिजाऊ उद्यानात आयोजन करण्यात आले आहे. बुधवार ता.२६ परिसरातील सर्व मंदिरांमधून दिपोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे माऊली जगताप यांनी सांगितले.