Slide 1 of 1 

सांगवी, पिंपळे गुरव येथे वसुबारस उत्साहात-
जुनी सांगवी पिंपळे गुरव परिसरात वसुबारस उत्साहात साजरी करण्यात आली.वसुबारसनिमित्त कामधेनू गाय आणि वासराचे सामूहिक पूजन करण्यात आले.
आमदार लक्ष्मण जगताप व शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी सांगवी येथील सक्सेस ग्रुप आणि सुनेत्रा महिला प्रतिष्ठानच्या वतीने श्री गजानन महाराज मंदिरासमोर व पिंपळे गुरव येथे देवकर परिवाराच्या वतीने वसुबारसनिमित्त सामूहिक गोमाता पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्यासह महिलांनी गाय वासरांचे पुजन केले.
यावेळी माजी महापौर उषा ढोरे, सक्सेस ग्रुपचे अध्यक्ष दिलीप तनपुरे,सुनेत्रा महिला प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा मंदाकिनी तनपुरे, शोभा जांभूळकर, सारिका भंडलकर, पुष्पा डोकचवळे, संगीता दिक्षीत, सोनाली शिंपी, अनिता ढमाले,
पिंपळे गुरव येथे विजय जगताप, उर्मिलाताई देवकर, शुभांगी जगताप, कावेरी जगताप, माधवी राजापुरे, संतोष कांबळे, सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल टोणपे, राजेंद्र राजापुरे, बाळासाहेब देवकर, अंबरनाथ कांबळे, संजय जगताप, बबन देवकर, महेश जगताप, सखाराम रेडेकर, आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.