Slide 1 of 1 

निळू फुले नाट्यगृहात दिवाळी पहाटचे आयोजन-
पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने नटसम्राट निळुफुले नाट्यगृहात दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले असून, दिग्गज गायक गायिका रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. रवि.ता. २३, ते २५ ऑक्टो. पर्यंत तीन दिवस दिवाळी सांगितिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी दिली.
यात रवि.ता.२३ सुपरस्टार फेम विनय देशमुख, महागायिका उत्तरा केळकर, सारेगम फेम अश्विनी मिठे यांचे गायन, सोमवार ता. २४ रोजी गायिका पल्लवी पत्की-ढोले, इंडियन आयडॉल फेम मुनावर अली, संजय हिवराळे यांचे गायन होणार आहे. मंगळवार ता.२५ रोजी आंतरराष्ट्रीय गायक हिम्मत कुमार पंड्या, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका शीर्षक गीत गायक संदीप उबाळे, प्रसिद्ध गायिका चारुलता, गायिका मंजुश्री देशपांडे यांचे सुमधुर गायन होणार आहे.
कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक सदानंद गाडगीळ करणार आहेत.