वाचन प्रेरणा दिन साजरा
राजा श्री शिवराय प्रतिष्ठान माध्यमिक विद्यालय कोथरूड,येथे डाॕ.ए.पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी एक दिवस वाचनाचा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी वाचन उतारे तसेच गोष्टींच्या पुस्तकांचे वर्गा-वर्गात वाचन केले.सर्व विद्यार्थ्यांना डाॕ.ए.पी जे अब्दुल कलाम तसेच वाचनप्रेरणा दिनाविषयी माहिती सांगण्यात आली त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका मीना आंधळे यांच्या मार्गदर्शनाने अंजली जोशी यांनी केले. यासाठी जेष्ठ शिक्षक डाॕ. शांताराम डफळ व मराठी भाषाविषय शिक्षक संजय पिंगळे व जयश्री फेंगसे यांचे सहकार्य लाभले.