कवठे येमाईच्या सरपंचपदी शिवसेनेच्या सौ.सुनिता बबनराव पोकळे यांची निवड
कवठे येमाई प्रतिनिधी धनंजय साळवे - कवठे सरपंच पदाचा मंगल रामदास सांडभोर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पुन्हा निवडणुक घेण्यात आली .या ग्रामपंचायत वर शिवसेना पुरस्कृत डॉ.सुभाष पोकळे यांच्या पॅनलचे वर्चस्व आहे.विरोधी गट हा राष्ट्रवादी पक्षाच्या विचारांचा आहे.सतरा जणांची सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये सोळा सदस्यांनी मतदानात भाग घेतला शिवसेना पुरस्कृत पॅनलकडुन सुनिता बबनराव पोकळे व राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलकडुन मनिषा पांडुरंग भोर यांनी अर्ज भरला होता. विजयानंतर सुनिता पोकळे यांनी जनतेकरीता ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्या सामान्य माणसाकरीता राबविण्यात येतील.तसेच वाड्यावस्त्यावरील लोकाच्या पाणी,आरोग्य,शिक्षण,याकडे विशेष लक्ष पुरविले जाईल असे स.राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते यांनी बाळासाहेब डांगे यांनी चांगल्या कामाला आमचा नेहमीच पाठींबा राहील परंतु चुकीच्या कामाला आमचा विरोध राहील.डॉ.सुभाष पोकळे यांनी नवनिर्वाचित सरपंचांचे अभिनंदन करुन सर्वसामान्य जनतेच्या विकासाकरीता काम करण्याचे आश्वासन दिले. या संवेदनशील निवडणुकीदरम्यान पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक सचिन उगलेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नागलोड साहेब,पवार साहेब,पालवेसाहेब,ईतर पोलीस कर्मचारी व होम गार्ड च्या कर्मचाऱ्यांनी ठेवला होता.पोलीस पाटील पवार यांनी पोलीसांना सर्व सहकार्य केले.तसेच निवडणुक अधिकारी म्हणुन मंडल अधिकारी माधुरी बागले यांनी काम पाहिले.
Tags:
1
313 Views