Slide 1 of 1 

वसुबारस निमित्त गाय, वासरू पूजन
वसुबारस निमित्त गाय, वासरू पूजन
मुंढवा, ता.२१ः-केशवनगर- मुंढवा परिसरात ठिकठिकाणी गोमाता पूजनाने वसुबारस साजरी करण्यात आली. घरात लक्ष्मीमातेचे आगमन व्हावे, या उद्देशानेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्यात येते. विशेषतः या ग्रामीण पट्ट्यात विशेष उत्साह पाहण्यास मिळाला. वसुबारसेला गाईची सायंकाळी महिलांनी पूजा केली.
केशवनगर लोणकर वस्तीतील नाजुका नामक गाय, सानू नामक वासराचे सामुदायिक पूजन सोहळा पार पडला. विक्रम लोणकर यांच्या घराच्या प्रांगणात प्रथम पूजन आशा लोणकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विजया लोणकर, माधवी लोणकर व आलेल्या महिलांच्या समूहाने गायवासराची पुजा केली. सुप्रिया व रेशमा लोणकर यांनी रंगीत रांगोळीत गाय वासरूचे चित्र काढले.
भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीच्या पावन पर्वास आजपासून वसूबारस व धनत्रयोदशीने सर्वत्र उत्साहात सुरवात झाली. महिलांनी पारंपरिक पद्धतीने सायंकाळी नवीन धान्याचा घास गाय, वासरांना पूजा करून दिला. अनेक महिला सायंकाळी गाय, वासरांचा शोध घेत पूजा केली. त्याच बरोबर धनत्रयोदशीनिमित्त घरातील धनाचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. पूजनानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
फोटोः-केशवनगर लोणकर वस्तीत वसुबारस निम्मित्त गायीची पूजा करतांना महिला.
(MUN21oct03-p3)