Slide 1 of 1 

भिंताडेनगर-सोमजी रस्त्यालगतची विहीर मृत्यूची घंटा
स्थानिकांची तक्रार ः पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी
अशोक बालगुडे
उंड्री, ता. 21 ः उंड्री-पिसोळी (ता. हवेली) शिवेवरील भिंताडेनगर-सोमजी पीएमपी बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची विहिर वाहनचालकांसाठी मृत्यूची घंटा ठरत आहे. या रस्त्याने स्कूल बस आणि नोकरदारवर्गाची मोठी वर्दळ असते. त्यामुळे विहिरीला कठडा बसवावा, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे वारंवार केली आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याची तक्रार नोकरदार-पालक विद्यार्थ्यांनी केली.
उंड्रीतील भिंताडेनगर-सोमजी बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तक्रारीची दखल घेऊन पालिकेच्या पथ विभागातील सचिन बिडवे व अभिजित सूर्यवंशी यांना घटनास्थळी येऊन पाहणी केली. संबंधित विहीर मालकाला नोटीस देऊन तातडीने सुरक्षा व्यवस्था केली जाईल, असे काशिनाथ भिंताडे यांनी सांगितले.
भिंताडेनगर-सोमजी बसस्थानक मार्गे कोंढव्याकडे जामाऱ्या रस्त्याने हिल ग्रिन स्कुल, संस्कृती स्कुल, बिशप्स स्कुलमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसेस धावतात. बाह्यवळण मार्गावरील गर्दीतून जाण्याऐवजी जवळचा मार्ग म्हणून नोकरदार-कामगार या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरीला नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठडे बसवावेत.
राजेंद्र भिंताडे, रोहन पाटील, उंड्री
दरम्यान, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे म्हणाल्या की, विहिरीच्या मालकाला वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षा जाळी किंवा कठडा उभारावा, असे पत्र दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
उंड्री ः भिंताडेनगर-सोमजी बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची धोकादायक विहीर.
Tags:
1