Slide 1 of 1
मोफत उपचारांचा कायदा झालाच पाहिजे; या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषदेचे रास्ता रोको आंदोलन!
पुणे - ●रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीने आज अलका टॉकीज चौकात अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोखून धरला.●
●नागरिकांना मोफत उपचार मिळवण्यापासून मज्जाव करणे, रुग्णांना शासकीय निधी मिळविण्यापासून अडवणूक करणे●
●बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून दोन दोन चार चार दिवस रुग्णांचा डिस्चार्ज जाहीर झाल्यावरही अडवणूक करणे, ●
●रुग्णांना डांबून ठेवणे, रुग्णांचा प्रचंड अपमान करणे अशा बाबी सर्रास घडत आहेत, यासाठी दर्जेदार उपचार मोफत मिळावेत म्हणून फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा झाला पाहिजे, ●
●नागरिकांना मोफत उपचार मिळवण्यापासून मज्जाव करणे, रुग्णांना शासकीय निधी मिळविण्यापासून अडवणूक करणे, बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून दोन दोन चार चार दिवस रुग्णांचा डिस्चार्ज जाहीर झाल्यावरही अडवणूक करणे, रुग्णांना डांबून ठेवणे, रुग्णांचा प्रचंड अपमान करणे अशा बाबी सर्रास घडत आहेत,●
●यासाठी दर्जेदार उपचार मोफत मिळावेत म्हणून फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा झाला पाहिजे, यासाठी रुग्णाक परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने आज पुण्यातील अलका टॉकीज चौक येथे लक्ष्मी रस्ता अडवून रास्ता रोको आंदोलन आज करण्यात आले●
रुग्ण हक्क संरक्षण कायदा झालाच पाहिजे यासाठी सर्व कार्यकर्ते अत्यंत आग्रही होते. दरम्यानच्या काळात या आंदोलनाची तीव्रता वाढणार असून पुण्यातील प्रत्येक चौकामध्ये रुग्ण हक्क परिषद कायदा झालाच पाहिजे यासाठी आंदोलन छेडणार आहे, अशी माहिती अजय भालशंकर यांनी दिली.
Tags:
1