ऑम्लेट व्यवस्थित न बनविल्याने पोलीसाकडून पत्नीचा खून
भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा ः
पुणे : ऑम्लेट व्यवस्थित न बनविल्याच्या कारणावरून पोलीस हवालदाराने पत्नीचा गळा दाबून खून केला. मध्यस्थी करणाऱ्या मुलाला हवालदाराने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पोलीस हवालदारास अटक केली.या प्रकरणी पोलीस हवालदार मनीष मदनसिंग गौड (वय ५०, रा. दत्तविहार सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) यांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, गौड पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहेत. ते आंबेगावमधील दत्तविहार सोसायटीत राहायला आहेत. ऑम्लेट न केल्याने गौडने पत्नीला शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर गौड यांनी स्वयंपाकघरातील सांडशी पत्नीच्या डोक्यात मारली. पत्नीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गौड यांचा मुलगा घरात होता. मुलाने मध्यस्थी केली. तेव्हा त्याला गौड यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Tags:
1