झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृतदेह नाल्यात आढळला
कोंढवा पोलिसांत तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार
पुणे, ता. 21 ः कोंढव्यातील ३१ वर्षीय बेपत्ता झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृतदेह नाल्यात आढळून आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय कुमार यादव (वय ३१) असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, संजय कुमार यादव याच्या कुटुंबायांनी तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. संजय कुमार यादव डिलिव्हरी बॉय म्हणून एका कंपनीत काम करायचा, अशी माहिती कुटुंबियांनी दिली होती. त्या माहितीच्या आधारे संजय कुमार यादव याचा शोध सुरू होता. आज कोंढवा-महंमदवाडी येथील अर्चना परॅडाईजजवळील नाल्यामधे एक मृतदेह आढळून आल्याची माहिती सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास मिळाली. तपासाअंती तो मृतदेह संजयचा असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संजयचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास पाठवला असून, अहवाल आल्यानंतर नेमक मृत्यूचं कारण समजू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.