Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Nikhil Gaikwad
21 Oct, 8:14 PM
more-icon

पुण्यातील गणेश मंडळाचा पहिला विधायक दिवा वंचितांसोबत.....

पुण्यातील गणेश मंडळांनी दिवाळी पहिल्या दिवशी वंचिता सोबत दिवाळी भेट देऊन विधायक पद्धतीने साजरी केली. डोंगराळ भागात राहणाऱ्या गोरगरीब कष्टकरी कातकरी व आदिवासी वस्तीवरील कुटुंबांसोबत दिवाळीचा पहिला दिवस "वसुबारस" साजरा करण्याचा अभिनव विधायक उपक्रम पुण्यातील गणेश मंडळांनी राबविला. येरवडा येथील नवज्योत मित्र मंडळ गुरुवार पेठ येथील वीर शिवराज मंडळ व बुधवार पेठेतील साईनाथ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे-सातारा रस्त्यावरील कापूरहोळ नजीकच्या चेलाडी येथील बनेश्वर आदिवासी वस्ती येथील 50 कुटुंबांना लाडू चिवडा फरसाण करंजी चकली या दिवाळीच्या फराळा सह आकाश दिवे, पणत्या, फटाके व कपडे भेट दिली. दिवाळीचा आनंद त्या वंचितांना देखील साजरा करता यावा म्हणून पुण्यातील गणेश मंडळांनी हा अभिनव उपक्रम राबविला. त्यासोबतच मुलांना चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या असा संदेश व दिवाळीच्या शुभेच्छा देखील त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी शिवराज मंडळाचे अध्यक्ष किरण सोनवाल, मोहित झांजले, चैतन्य सिन्नरकर, नवज्योत मंडळाचे अमित जाधव, अक्षय रजपूत व साईनाथ मंडळाचे पीयूष शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुण्यातील गणेश मंडळांनी अचानक दिवाळीनिमित्त दिलेल्या या आनंददायी भेटीमुळे वस्तीवरील लहान मुले त्यांचे पालक तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
Tags:  
./../../../../assets/lottie-icons/Like.svg
1
264 Views
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km