अवैधरीत्या राहणा-या परदेशी नागरिकास अटक
अवैधरीत्या राहणा-या परदेशी नागरिकास अटक
मुंढवा, ता.२१ ः-मुंढवा पोलिसांनी नायझेरियातील एका नागरिकाला ताब्यात घेतले असून तो भारतात २०१४ पासून
विनापरवाना राहत असल्याचे आढळून आले आहे.
अबयोमी बाबाट्युनबे ओगनरेमी (वय ३२, सध्या रा. डी २/ ९०१ लेक डिस्टीक सोसायटी येवलेवाडी) असे या परदेशी नागरिकाचे
नाव आहे. त्याला गस्तीवर असलेले सहा. पोलिस निरिक्षक विलास सुतार, सहा. पोलिस निरिक्षक संदीप जोरे व गुन्हे शाखेच्या
दहशतवादविरोधी पथकाने विनापरवाना राहत असल्याचे आढळून आले त्यामुळे त्य़ाला अटक केली. अशी माहिती वरिष्ठ
पोलिस निरिक्षक अजित लकडे यांनी दिली.
याबाबत पोलिस अंमलदार निलेश पालवे यांनी फिर्याद दिली.