दिवाळीच्या तोंडावर देशासह राज्यात महागाईचा भडका : अजित पवार
दिवाळीच्या तोंडावर देशासह राज्यात महागाईचा भडका उडालेला असून केंद्र व राज्य सरकार कुठलीच भूमिका घेत नसल्याने जनता महागाईने त्रस्त झाल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,बाणेर, बालेवाडी, सूस व महाळुंगे यांच्या वतीने बाणेर येथे विरोधी पक्षनेते पवार यांच्या हस्ते दिवाळी सरंजामचे वितरण संपन्न झाले.
त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी खासदार ॲड. वंदना चव्हाण,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा,शहराध्यक्ष प्रशांत जगताप, मारुतराव धनकुडे,विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे,अंकुश काकडे,ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, सुनील चांदेरे, ज्ञानेश्वर तापकीर , मंगलदास मुरकुटे, दिलीप मुरकुटे, चंद्रकांत जाधव,रोहिणी चिमटे,ज्योती सुर्यवंशी, सुहास भोते यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीच्या वतीने महागाई विरोधात आंदोलने सुरू असून योग्य त्या दरात जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्यांना मिळाल्या पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. परंतु या सर्व गोष्टींना तिलांजली देण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करत असून या महागाईमुळे सर्वसामान्य गोर - गरिबांचे कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य जनतेला जगण्याचा अधिकार आहे की नाही ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Tags:
57 Views