क्षेत्रिय कार्यालयाच्या गच्चीवर फळ बाग फुलली
टाकाऊतून टिकाऊ हा संदेश फक्त इतरांना सांगण्यासाठी नव्हे तर प्रत्येकाने जीवनात अंमलबजावणी करण्याकरता आहे. आपल्या आचरणातून लोकांपुढे आदर्श देता आला पाहिजे हा विचार बाळगत वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयातील कर्मचा-यांनी गच्चीवर फळभाज्यांनी बहरलेली बाग तयार केली. वांगी, टोमॅटो सारखी फळभाजी लगडलेली रोपटी पाहून उपस्थितांनी या उपक्रमाला कोतुकाची दाद दिली.
वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या गच्चीवर 'टाकाऊतून टिकाऊ' उपक्रमा अंतर्गत अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले प्लास्टिकचे मोठे क्रेट आणून त्यामध्ये रोपे लावण्यात आली. आजूबाजूच्या घरांतील ओला कचरा आणून त्यात जिरवण्यात आला. सेंद्रिय खत मिळाल्याने बाग बहरुन आली. या बागेचे उद्घाटन घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त आशा राऊत यांच्या हस्ते व पुणे मनपा चे ब्रँड अँबेसिडर सलील कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाडगे, माजी नगरसेवक व मोहल्ला कमिटी सदस्य उपस्थित होते.
महापालिका सहायक आयुक्त राजेश गुर्रंम म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत स्वच्छ प्रभाग मानांकन या बाबींच्या अनुषंगाने आम्ही क्षेत्रिय कार्यालय इमारतीच्या गच्चीवर'आम्ही माती विरहित फळबाग फुलवली. ब्रँड अँबेसिडर रुपाली मगर, सहवर्धन संस्थेचे स्वयंसेवक, मोहल्ला कमिटी सदस्य, ग्रीन हिल्स संस्था व सुनील भिडे व अर्चना गोगटे यांनी या कामात मोलाचे योगदान दिले आहे. प्रशासन आणि नागरिक एकत्र करून काय कायापालट करू शकतात याचं आदर्श उदाहरण बनली. या उपक्रमाव्दारे आम्ही लोकांना चांगला संदेश देवू शकलो याचा विशेष आनंद वाटतो.
फोटो
क्षेत्रिय कार्यालयाच्या गच्चीवर फुललेली फळबाग
Tags:
1
102 Views