व्यसन आणि फॅशनमध्ये आजची तरुणाई गुंतली आहे - डाॕ. प्रकाश पांढरमिसे
स्थळ - खडकी
एन एस एसच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे काम करते.जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका घेऊन काम करावे. ज्ञान, सेवा, त्याग समर्पण म्हणजे राष्ट्रीय सेवा होय. एन एस एसच्या माध्यमातून माणसे घडतात, बिघडत नाही. गतीशिवाय प्रगती नाहीं. गतीने जाताना मध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत जायचे असते. ' असे प्रतिपादन डाॕ. प्रकाश पांढरमिसे यांनी केले.
खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवकांसाठी उद्बोधन शिबिर पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला प्रमुख पाहुणे, वक्ते- मार्गदर्शक प्रा.डाॕ. प्रकाश पांढरमिसे यांचा परिचय प्रा.प्रिया शिर्के यांनी केला पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य आणि उद्बोधन शिबीराचे अध्यक्ष प्राचार्य डाॕ.संजय चाकणे यांनी केले. या उद्बोधन शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.डाॕ. प्रकाश पांढरमिसे यांनी स्वयंसेवक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, "संधी निर्माण केल्या पाहिजेत. संधी कोणीच कोणाला देत नाहीत .तुम्हाला तरी कोण देईल ? अशावेळी तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रात नैपुण्य मिळवले तर ती संधी तुम्हाला शोधत येईल. तरुणाईने संधीचा सदुपयोग केला पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष
महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.संजय चाकणे यांनी सांगितले की एन एस एसमधून मिळणारी एक संधी सतत व्यक्तिमत्त्वाला एक नवी दिशा देण्याचे काम करते.
याप्रसंगी रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॕ.सुचेता दळवी यांनी प्रास्ताविकेतून शिबिरामागील प्रयोजन सविस्तर स्पष्ट केली. प्रमुख अतिथी डॉ. प्रकाश पांढरमिसे यांचा परिचय प्रा.प्रिया शिर्के यांनी करून दिला.शिबिराचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.संजय चाकणे होते. मराठी विभागप्रमुख प्रा.डाॕ.महादेव रोकडे, डॉ. शैलेंद्र काळे उपस्थित होते. प्रा.डाॕ.तेजस्विनी शेंडे, रा.से.यो.चे सहा.अधिकारी प्रा.भागवत शिंदे, प्रा.रूपाली अवचरे, प्रा.कविता चव्हाण, प्रा.जितेंद्र मडके यावेळी उपस्थित होते. विजय दुदुस्कर व इतर सेवकांनी साहाय्य केले. तांत्रिक सहकार्य अमोल आमराव यांनी पाहिले. सूत्रसंचालन रा.से.यो.च्या स्वयंसेविका शीतल भुजबळ या विद्यार्थिनीने केले. रा.से.यो.सहा.अधिकारी प्रा.अविनाश कोल्हे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Tags:
78 Views