Slide 1 of 1 

"आदर्श विद्यार्थी हाच शिक्षकाचा खरा पुरस्कार" -डॉ. दिलीप गरुड, मुख्याध्यापिका सुरेखा पाटणे यांचा सेवापुर्ती समारंभ संपन्न.
आदर्श विद्यार्थी हाच शिक्षकाचा खरा पुरस्कार: डॉ.दिलीप गरुड यांचे प्रतिपादन
"उच्च विद्याविभूषित आदर्श विद्यार्थी, हाच शिक्षकाला मिळालेला खरा पुरस्कार होय," असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ.दिलीप गरुड यांनी काढले.येरवडा येथील पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्र.६ या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुरेखा विलास पाटणे यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या विद्यानिकेतन शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी आज मोठमोठ्या पदांवर समर्थपणे कार्य करत आहेत. अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धापरीक्षांची तयारी, योगासन, नमस्कार आणि कला-क्रीडा स्पर्धेतदेखील शाळेला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत अनेक विद्यार्थी चमकले आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका डॉ.लता पाडेकर यांनी केले. मानपत्राचे वाचन आरती चौधरी यांनी केले.सत्कारमूर्ती सुरेखा पाटणे यांनी आपले सर्व सहकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच प्रशासन यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. सहायक प्रशासकीय अधिकारी शिल्पकला रंधवे,सुभाष सातव ,विजय आवारी, एम.आर. जाधव, क्रीडा विभागाचे सहायक प्रशासकीय अधिकारी माणिक देवकर हे उपस्थित होते. शाळेतील शिक्षक सतीश मोरे,माजी मुख्याध्यापक विठ्ठल डुंबरे, वसंतराव काळे, बाळकृष्ण बाचल,कल्पना चव्हाण, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी कैलास खांदवे आणि माजी विद्यार्थी यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी माजी मुख्याध्यापक दिलीप लोखंडे,वसंतराव भुजबळ, विलास रासकर, माजी सहाय्यक शिक्षणप्रमुख र.ना.जगताप, माजी पर्यवेक्षिका,राधिका बडगुजर,तसेच अनेक शाळांचे शाळाप्रमुख, शिक्षक, माजी विद्यार्थी, नातेवाईक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते. संजय गेंगजे व सेवानिवृत्त सेविका छाया विचारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी संगीतशिक्षिका पल्लवी गजरमल व नलिनी सुरगुडे आणि यशवंत गीतमंच यांनी निरोप गीताचे गायन केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय वंदना सोंडकर यांनी करून दिला. या सेवापूर्ती सोहळ्याचे आभारप्रदर्शन सुनंदा माने यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वाघमारे यांनी केले.
Tags:
1