Slide 1 of 1
अनाथ आश्रमातील विशेष मुलांनासोबत राष्ट्रवादी कॉग्रेसने साजरा केला दिवाळीचा पहिला दिवस
: Pune
प्रत्येकाच्या जीवनात एक प्रकाश, आनंद घेऊन येणार सण म्हणजे दिवाळी. या सणाला आज पासुन सुरुवात झाली आहे. या सणाची प्रत्येकाच्या घरी तयारी देखील पूर्ण झाली. मात्र समाजातील एक उपेक्षित घटक असा आहे की जो दिवाळी सण साजरा करीत नाही.
:अशा घटकातील विशेष मुलांना देखील दिवाळी सण साजरा करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी श्रीकांत पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी बोपोडी येथील स्पर्श अनाथ आश्रमात जाऊन अनाथ आश्रमातील विशेष मुलांसोबत दिवाळी सणाचा पहिला दिवस साजरा केला आहे. स्पर्श अनाथ आश्रम मधील विशेष मुलांना अभ्यंग स्नान घालून, औक्षण करून आणि त्यांना मिठाई भरवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिवाळी सणाचा पहिला दिवस साजरा करण्यात आला आहे.
Tags:
1