Slide 1 of 1
ड्रेनेज चेंबरमध्ये काम करताना तिघांचा गुदमरून मृत्यू
- वाघोली:- मोझे कॉलेज रस्ता येथील सोलासीय सोसायटीच्या चेंबर मध्ये कर्मचारी काम करताना अडकून तीन कामगारांचा मृत्यू.
- पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढले.
- वाघोली येथील बाय रोडवरील सोलासीय सोसायटीमध्ये मधील चेंबरमध्ये काम करणाऱ्या नितीन प्रभाकर गोड (वय ४५ वर्षे), गणेश भालेराव (वय २८ वर्षे), सतीशकुमार चौधरी (वय ३५वर्षे) रा:वाघोली तिघांचा काम करत असाल असताना चेंबर मध्येच गुदमरून मृत्यू झाला असल्याची माहिती प्राथमिक दर्शनी पोलिसानी दिली.
- फायर ब्रिगेडचे विजय महाजन, अक्षय बागल, मयूर गोसावी, चेतन समशे, तेजस सागरे, नितीन माने, संदीप शेळके, अभिजीत दराडे, विकास पालवे यांच्या टीमने दोघांना चेंबरमधून बाहेर काढले आहे. तर एकाचा शोध अद्याप सुरूच आहे. घटनास्थळी लोणीकंद पोलिसांचे पथकही दाखल झाले आहे.
Tags:
1
597 Views