Slide 1 of 1
तरवडेवस्ती येथे जलवाहिनी फुटून पाणी वाया
स्थानिक नागरिकांचा संताप
उंड्री, ता. 21 ः महंमदवाडीतील तरवडेवस्ती येथे डॉ. दादा गुजर शाळेसमोर जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. रस्त्यावर पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. आम्हाला पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही, दुसरीकडे दुरुस्तीच्या अभावामुळे पाणी वाया जात आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, अशी संतप्त भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. उपनगर आणि लगतच्या गावातील नागरिकांना रात्री-अपरात्री आणि कमी दाबाने पाणी पाण्यासाठी जागरण करावे लागत आहे. प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे जीर्ण झालेल्या जलवाहिनी वारंवार फुटून पाणी वाया जात आहे, तसेच व्हॉल्व्हमधून दररोज मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असूनही त्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी गांभीर्याने पाहणार आहेत की, नाही, असा संतप्त सवाल हनुमंत घुले, बाळासाहेब घुले यांनी उपस्थित केला.
दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, तातडीने जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाला सूचना देतो, असे सांगितले.
उंड्री ः महमंदवाडीतील तरवडेवस्ती येथे जलवाहिनी फुटून पाणी वाया गेले.
Tags:
3