Slide 1 of 1 

कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात ऐन सणासुदीत बत्ती गुल
- कात्रज-कोंढवा परिसरात ऐन सणासुदीत बत्ती गुल झाली आहे.
- सुखसागरनगर, गोकुळनगर, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, माऊलीनगर आदी परिसरात जवळपास तब्बल २० तासांपासून वीज गायब आहे.
- अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शून्य प्रतिसाद मिळत असून वीजपुरवठा सुरळीत होईल असे केवळ सांगितले जात आहे.
- मात्र, तो कधी होणार याचे ठोस उत्तर कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे नाही.
- टिळेकरनगरमधील एका अरुंद रस्त्यावर केबल जळाली होती.
- त्यानंतर रात्रभर पाऊस असल्याने काम करता आले नाही.
- मात्र, लवकरच वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
- गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास गायब झालेली वीज शुक्रवारी १० वाजताही आलेली नव्हती.
- त्यामुळे याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणांत फटका बसला.
- विज पुरवठा खंडित झाल्याने मोठ्या इमारतीच्या लिफ्ट बंद आहेत.
- पाणी वर चढवता येत नसल्याने दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झाला आहे. अनेकांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण, कात्रजचे कार्यालय सायंकाळी सहानंतर बंद असल्याने उत्तर काहीच मिळाले नाही. या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असल्याने महावितरण विभागाने तातडीने लक्ष घालून अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. याबाबत धनकवडी विभागाचे अभियंता संजय घोडके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.