Slide 1 of 1 

वाहनचोरीतील सराईत दोघांना ठोकल्या बेड्या
साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त ः दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2ची कामगिरी
पुणे, ता. 21 ः दोनशे-अडिचशे सीसीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वाहनचोरीतील दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2ने बेड्या ठोकल्या. आरोपीकडून 12 लाख 40हजार रुपयांच्या चारचाकी व दुचाकी जप्त केल्या. लोणीकंद, चंदननगर, खडकी, मुंढवा, चाकण व कोपरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हे उघडकीस आणले.
समाधान देविदास राठोड (वय २२, रा. मु.पो. आंदरसुळ, ता. येवला, जि. नाशिक, मुळगाव करंजी बोलकी, ता.कोपरगाव, जि. अहमदनगर), प्रकाश श्रीराम आढाव (वय ३०, रा. शिक्षक कॉलनी, तळेगावढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) आकाश बबन धोत्रे (वय २७, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे नारायण शिरगांवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, विनायक रामाणे, अशोक आटोळे, दत्तात्रय खरपुडे, सुदेश सपकाळ, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, अमोल सरतापे, विनायक येवले, राहुल इंगळे, संदीप येळे, विक्रांत सासवडकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Tags:
3
186 Views