सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या
गुन्हे शाखेच्या युनिट-5ची कारवाई - 3 लाखांचे 16 सायलेन्सर जप्त
पुणे, ता. 21 - मोटारींचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट-5ने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ३ लाख २० हजारांचे १६ सायलेन्सर जप्त करण्यात आले. त्यांनी हडपसर, शेवाळवाडी, फुरसुंगी, देवाची ऊरुळी, मुंढवा, मांजरी येथील सायलेन्सर चोरी केल्याचे तपासात उघड झाले. आरिफ सलीम शेख (१९ रा. हडपसर), हुसेन बढेसाहब शेख (२३), साहिल वसीम शेख (१९ रा. वैदवाडी, हडपसर), सहजाद अक्रम खान (१९ रा. वैदवाडी, हडपसर), रहीम खलील शेख (२४, रा. रामटेकडी), सोहेल सलीम खान (२३, महंमदवाडी रोड) यांना अटक केलेल्यांची नावे आहेत. सायलेन्सरमधील मौल्यवान प्लॅटिनम धातूमिश्रित माती काढून ती परराज्यातील आरोपींना विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
-----------------
Tags:
3