दहा कोटी कोव्हिशिल्ड लस गेली वाया : अदर पुनावाला
पुणे, ता. 21 ः कोरोना महामारीचा ज्वर कमी झाला आणि नागरिकांनी लसीकरण करून घेण्याकडे पाठ फिरविली. डिसेंबर २०२१ मध्ये कोव्हिशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन थांबवले. तरीही कोव्हिशिल्ड लसीचे १० कोटी डोस कालबाह्य झाल्याने वाया गेले, अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली. पुनावाला म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीपेक्षा फ्लू लसीकरणाविषयी अधिक उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. आम्ही स्वाइन फ्लूच्या सुरुवातीलाच फ्लूवरील लस तयार केली. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आपल्याकडे फ्लू म्हणजे किरकोळ समजला जातो. त्यासाठी भारतात फ्लू लसीकरणाची गरज वाटत नाही. दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी कोरोना आणि फ्लूची लस नियमितपणे घ्यावे लागेल. कोव्होव्हॅक्सचा वापर बूस्टर म्हणून करण्यास १०-१५ दिवसांत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. एचपीव्हीसाठी तयार केलेल्या पायाभूत सुविधा कोरोनासाठी वापरण्यात आली. २०२३ मध्ये एका वर्षात २ कोटी डोस उत्पादित केले जातील. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर युनिसेफ, गावी यांच्याशी चर्चा करून २०२४ मध्ये एचपीव्ही लसीचे डोस निर्यात केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Tags:
3